दौंडच्या कुरकुंभ मोरीचे काम रेंगाळले

आमदारांनी पाठपुरावा करावा…
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मतदार संघातील रस्त्यांच्या कामाकरिता कोट्यावधींच निधी आणला आहे. त्यानुसार आमदार कुल यांनी कुरकुंभ मोरीच्या कामाकरिताही पाठपुरावा करून या कामी पुढाकार घ्यावा. शहरातील महत्त्वाच प्रश्‍न कायम स्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नगरपरिषदेकडून रेल्वेची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कार्यवाही संथगतीने

दौंड  – दौंड शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता कुरकुंभ मोरीलगतच रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढण्यात येत असून याकरिता “कोडल चार्जेस’ही (नुकसान भरपाई) 2 कोटी 82 लाख 81 हजार 250 रूपयांचा निधी नगरपालिकेने रेल्वे खात्याकडे वर्ग केला आहे, त्यानंतरही हे काम गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दौंड शहराची विभागणी रेल्वे लाईनमुळे झाली आहे. शहराच्या एका भागातून अन्य परिसरात जाण्याकरिता बाजारपेठेतून रेल्वे पुलाखालील मोरी हा एकमेव जवळचा मार्ग आहे. याठिकाणी सुरवातीला उड्डाणपुल व्हावा, अशी मागणी होत होती. परंतु, त्यानंतर मोरी रूंदीकरण तसेच रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याच कारणास्तव नुकसान भरपाई म्हणून नगरपालिकेला रेल्वेकडे ठराविक रक्कमेचा भरणा करायचा होता. त्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या कारकिर्दीत या कामाकरिता (दि.28 एप्रिल 2015) नगरपरिषदेस 3 कोटी रूपयांचा निधी कुरकुंभ मोरीच्या कामासाठी प्राप्त झाला त्यानुसार तातडीने 2 कोटी 82 लाख 81 हजार 250 रूपयांचा निधी रेल्वे खात्याचा नुकसान भरपाई (कोडल चार्जेस) भरण्याकामी देण्यात आला. कोडल चार्जेसची असणारी रक्कम पूर्ण झाल्याने रेल्वे खात्याकडून कुरकुंभ मोरीच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळून मोरीचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, ही प्रक्रिया अद्यापही रेंगाळली आहे.

राज्य शासनाकडुन मोरीच्या कासाठी 15 कोटी रूपये मंजुर झाले असुन पहिल्या टप्यात 4 कोटी रूपये नगरपरिषदेस मिळाले होते. त्यानंतर 3 कोटी व दुसऱ्या टप्यात 8 कोटी रूपये येणे बाकी होते. त्यानंतरही या मोरीचे काम पूर्ण करण्यासाठी दीड कोटींच्या आसपास निधीची गरज भासणार होती. परंतु, याबाबत पुढे कार्यवाही झालेली नाही. दौंड शहराचे वाढते नागरीकरण तसेच नागरिकांची होणारी गैरसोय पाहता कुरकुंभ मोरीचे विस्तारीकरण आणि रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. शहरातील दळण वळणाचा मुख्य रस्त्याचेच काम रेंगाळल्याने दौंडच्या विकासावरही मर्यादा येत आहेत. दौंड नगरपरिषदेने याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मध्य रेल्वेच्य माध्यमातून रेल्वेच्या दुहेरीकरण, विद्युतीकरण अशी कामे मार्गी लागत असताना दौंड शहराकरिता महत्त्वाच्या असलेल्या कुरकुंभ मोरीचे रस्त्याचे कामही तातडीने मार्गी लागावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)