दौंडच्या आमदारकीसाठी थोरात यांचे “लॉचींग’

केडगाव- दौंडच्या राजकारणाच पेच असतानाच भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि सहकारमहर्षी काकासाहेब थोरात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आनंद थोरात यांच्या वाढदिवसाला विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता. दौंडच्या राजकारणात आनंद थोरात हे आमदारकीसाठी आणखी एक आव्हान निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत.
आनंद थोरात यांचा वाढदिवस साजरा होत असताना सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी थेट शुभेच्छा दिल्या यामुळे आगमी राजकारणात काहीही होवू शकते. याची झलक पाहायला मिळाली. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे थोरात हे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत आव्हान निर्माण करतील अशीच चिन्हे दिसू लागली आहेत.
दौंड तालुक्‍यातील विविध गावातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. कोणतीही भाषणबाजी न करता शुभेच्छा कार्यक्रम झाला. सत्काराला उत्तर देताना आनंद थोरात भावनिक झाले ते म्हणाले की, वाढदिवस साजरा करायचा नव्हता; परंतु, कार्यकर्त्यांची इच्छा आणि आग्रह यामुळे सोहळा साजरास होत आहे. जनतेने प्रेम ठेवावे आणि मलाही परमेश्वराने जनतेवर प्रेम करण्यासाठी ताकद द्यावी, असे भावोद्गार थोरात यांनी काढले. आनंद थोरात यांची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली. स्व. काकासाहेब थोरात समाधीचे आणि बोरमलनाथ देवस्थानाचे दर्शन घेऊन कार्यक्रमस्थळी आलेल्या थोरात यांचे फटक्‍यांच्या आतिषबाजी आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
दरम्यान, थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड मेडिकल असोसिएशनच्यावतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात रक्तदान, गट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी नेत्र तपासणी, मोतिबिंदु शस्रक्रिया आदी कार्यक्रम राबविले गेले. तर, रविकांत जराड यांच्यावतीने 500 रोपांचे वाटप करण्यात आले. बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिर परिसरातील अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी आळंदी येथील बालयोगी सिद्धेश्वर महाराज, माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, सभापती झुंबर गायकवाड, माजी सभापती मीना धायगुडे, आनंद थोरात यांचे सासरे मारुतराव चोपडे बंधु आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)