दोन रुग्णालयांत आता “एनआयसीयू’

महापालिकेचा उपक्रम : 5 मे रोजी होणार कार्यान्वित

पुणे – महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी आणि सोनावणे रुग्णालयात नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (“नियोनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ -एनआयसीयू) कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते 5 मे रोजी याचे उद्‌घाटन होणार आहे. अनेकदा कमी वजनाच्या किंवा जन्मल्यानंतर इतर उपचारांसाठी अर्भकांना इमर्जन्सीची गरज पडल्यास कमला नेहरू किंवा ससून रुग्णालयाला नेण्याशिवाय पर्याय रहात नव्हता. त्यामुळे या दोन रुग्णालयांवरही ताण येत होता. ससूनमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण येतात. त्यामुळे महापालिका हद्दीतील नवजात शिशुंसाठी या दोन रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.

या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 12 बेडचा विभाग तयार करण्यात आला आहे. हा विभाग “सीएसआर’च्या माध्यमातून उभारण्यात आला असून, मुकुल माधव फाउंडेडेशन आणि फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजच्या सहकार्य यामध्ये मिळाले आहे.
सिव्हील आणि इलेक्‍ट्रिकल कामे ही महापालिका आणि या दोन्ही संस्थांनी मिळून, तर ऑक्‍सिजन पुरवण्याचे पूर्णपणे सहकार्य या दोन संस्थांचे आहे. यासाठी लागणारी यंत्रसामग्री महापालिकेने उभारली असून त्यासाठी सुमारे 74 लाख रुपये खर्च आला आहे. महापालिकेच्या डॉक्‍टर आणि नर्सेसना यासंबंधातील प्रशिक्षण या दोन्ही संस्थांच्या खर्चातून दिले जाणार आहे.
खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अनेक फायदे
कमी वजनाचे बाळ जन्माला आली अथवा जन्मत: काही समस्या उद्‌भवली तर त्यांना तातडीने याठिकाणी मदत मिळू शकते. बाळांची काळजी घेण्यासाठी सर्व प्रकारची तांत्रिक आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांची सोय याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे अन्य रुग्णालयांवर येणारा ताणतर कमी होईलच, परंतु ज्यांची आर्थिक क्षमता नाही किंवा खासगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा नाही, अशांसाठी हा विभाग म्हणजे संजीवनी ठरणार आहे, असे महापालिकेतील सहायक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)