दोन दिवसांत दोन अजगर पकडून जंगलात सोडले

वडगाव-मावळ (वार्ताहर) – वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे संस्थेने दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी दहा व आठ फूट लांबीचे अजगर पकडून जंगलात सोडले. औंढोलीजवळ पॉली हाऊसमध्ये दहा फूट लांबीचा अजगर असल्याची माहिती विशाल घुले यांनी दिली. संस्थेचे सदस्य मोरेश्‍वर मांडेकर यांनी वरिष्ठांना माहिती देऊन अजगर पकडला. सदस्य रोहित गायकवाड, दक्ष काटकर यांनी यावेळी मदत केली. दुसऱ्या दिवशी दि. 19 एप्रिलला संध्याकाळी पावणेआठ वाजता वेहेरगाव मावळ येथील बबन बोत्रे यांच्या राहत्या घरामागे आणखी एक अजगर आढळून आला. हार्दिक मालवाडिया, नीलम उपाध्याय, रोहित गायकवाड व मोरेश्‍वर मांडेकर यांनी अजगर पकडला. ग्रामस्थ महादू बैकर व अभिजित पडवळ यांनी सहकार्य केले.

अजगराविषयी थोडेसे…
अजगर (Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसर्प वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)