दोन कुटुंबांत हाणामारी : परस्परविरोधी गुन्हे दाखल

पुणे – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून किरकोळ कारणावरून दत्तवाडीतील दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. ही घटना शनिवारी मध्यरात्री शिंदे पिठाची गिरणी, दत्तवाडी येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही कुटुंबांतील काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय विर (52, दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप सुभाष खोपडे, नितीन सोपान मोरे, अश्‍विनी नितीन मोरे (रा. दत्तवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तर सचिन खोपडे (41) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय काळूराम विर, संजय काळूराम विर, मनीषा लोखंडे, वंदना विर (रा. दत्तवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांनीही परस्परविरोधात फिर्याद दिल्याने एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संजय विर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी खोपडे यांच्यासह इतरांनी फिर्यादी यांचा पुतण्या तुषार विर यास मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करत धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सचिन खोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांची बहिण तसेच दाजी यांना आरोपी विर याच्यासह इतरांनी मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी अधिक तपास दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)