दोन किमी चालत आल्या अ्‌न गाडी घेऊन गेल्या

आळंदीतील “वॉल मार्ट’च्या “लकी ड्रॉ’च्या सोडतीत उषा राठोड ठरल्या दुचाकीच्या मानकरी

आळंदी- ग्राहक हेच आपले दैवत असून, त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही तरी द्यावे या उद्देशाने आळंदी (ता. खेड) येथील वॉल मार्टचे सर्वेसर्वा दिलीप ठाकूर व संतोष थोरात यांनी ग्राहकांसाठी “लकी ड्रॉ’ची योजना तीन महिन्यांपूर्वी सुरू केली. याची सोडत शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढण्यात आली. यात प्रथम क्रमांकाच्या दुचाकीच्या मानकरी देहूफाटा येथील उषा गजानन राठोड या ठरल्या. दरम्यान, राठोड या बक्षीस घेण्यासाठी दोन किलोमीटवरून चालत आल्या अन्‌ घरी जाताना गाडीवर गेल्या. तर आपल्याला मिळालेल्या या बक्षिसाचे वर्णन करण्यास शब्द नसल्याचे सांगत त्यांनी वॉल मार्टला धन्यवाद दिले.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील मरकळ रस्त्यावर असणारे, अल्पावधीतच लोकप्रिय होऊन नावारुपास आलेले, तसेच लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले मॉल मार्ट येथे “ए’पासून “झेड’पर्यंतच्या सर्व वस्तू एकाच दालनात खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी “लकी ड्रॉ’च्या माध्यमातून विविध योजनांची मेजवानी देखील देण्यास सुरू केल्याने आळंदीतूनच नव्हे तर परिसरातील 10 गावांतील ग्राहकराजा येथे खरेदीसाठी येत आहे. दरम्यान, या सोडतीच्या प्रारंभी उपस्थितांनी दोन मिनटे स्तब्ध उभे राहून पुलवामामधील शहीद जवांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर शिवव्याख्याते गणेश खानवटे यांचे शिवचरित्रासह स्री भ्रुण हत्या, बेटी बचाव व व्यसनमुक्‍ती आदी विषयांवर अतिशय प्रभाव पाडणारे व्याख्यान सादर केले. त्यानंतर “लकी ड्रॉ योजनेतील विजेत्यांना बक्षीसे वाटप करण्यात आले. यावेळी मॉल मार्ट उद्योग समुहाचे दिलीप ठाकूर, संतोष थोरात, भगवान साखरे, जी. जी. रांजणे यांच्यासह सुमारे 60 कर्मचारी उपस्थित होते.
भेटवस्तूंमध्ये सोलापुरी चादरीपासून तर प्रथम क्रमांकास दुचाकी अशी एकापेक्षा एक सरस वस्तुंच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली. दरम्यान, मॉल मार्टने या सारख्या योजना वारंवार राबवाव्यात अशी मागणी ग्राहकांची केली. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात अतिशय साध्या, सोप्या व हास्यमयरीत्या विशाल आढाव यांनी सूत्रसंचालन करून ग्राहकांसह नागरिकांना खुर्चीवर खिळवून ठेवले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.