“दैनिक प्रभात’च्या डोर्लेवाडीतील वार्ताहराच्या कुटुंबीयांना धमक्‍या

याबाबतची तातडीने दखल घेवून डोर्लेवाडी गावात जावून संबंधितांना समज देण्यात येईल.
– सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक, बारामती ग्रामीण

झारगडावाडीतील अवैध धंद्याबाबात वेळोवेळी आवाज उठवल्याचा राग

डोर्लेवाडी – बारामती तालुक्‍यातील झारगडवाडीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी अनेकवेळा कारवाई केली. याचा राग मनात धरून काही दारूविक्री करणाऱ्या पुरुष व महिलेकडून दैनिक प्रभातच्या पत्रकाराच्या घरच्यांवर दबाब आणला जात आहे. त्यांना सांगितले जात आहे की, तुमच्या मुलाला आणि भावाला सांगा नाहीतर परिणाम वेगळे होतील. त्याच्यावर आम्ही करणी करू अन्नाला महाग करू असा दम देण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती तालुक्‍यातील झारगडवाडी गावात अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे गावातील महिला व नागरिकांनी हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याकडे अनेक दिवसांपासून वारंवार केली आहे. याबाब त सातत्याने दैनिक प्रभातमध्ये वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे झारगडवाडीतील अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर वारंवार वृत्त प्रसिद्ध होत असल्याने पोलिसांनीही अनेकवेळा दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आणि याचा राग मनात धरून काही दारूविक्री करणाऱ्या पुरुष व महिलेकडून पत्रकाराच्या घरच्यांवर दबाब आणला जात आहे. त्यांना सांगितले जात आहे की, तुमच्या मुलाला आणि भावाला सांगा नाहीतर परिणाम वेगळे होतील असे सांगून पत्रकाराच्या घरच्यांना गावातील खबऱ्या आणि हितचिंतकाकडून निरोप देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)