देहूगावातील सोळा लाखांच्या मुरुमाची चर्चा

टप्प्याटप्प्याने मुरूमीकरण : निविदा काढण्याचा प्रश्‍नच नाही – प्रशासनाचे स्पष्टीकरण

देहुरोड – देहू ग्रामपंचायतीमार्फत रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे 16 लाखांचा मुरूम टाकण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देहू ग्रामपंचायतीमार्फत परिसरातील विविध भागात रस्त्यांच्या डागडुजी करता सुमारे सोळा लाखांचा मुरूम टाकण्यात आल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा तसेच निविदा न काढता हा मुरूम कसा मागविला ? मुरूम टाकणाऱ्यांनी शासनाचा महसूल भरला आहे का ? सोसायट्या व प्लॉटिंगने जागा विकणाऱ्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आले आहे, तर अशा खासगी सोसायट्यांचे अंर्तगत रस्ते ग्रामपंचायतकडे वर्ग केले आहेत का? मुरूम टाकण्यासाठी काही सदस्यांचा विरोध असल्याबाबत ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर आणि सरपंच उषा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामपंचायती मार्फत तसेच नागरिकांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांच्या मागणीनुसार हा मुरूम टाकण्यात आला. पालखी सोहळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुतर्फा असलेला गाळ तसेच पावसाळ्यात अंतर्गत रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार दोन टप्प्यात हे काम करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात सुमारे आठ लाखांचा मुरूम टाकण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात सात लाख, 26 हजार 400 रुपयांचा मुरूम टाकण्यात आला आहे. या संदर्भात सरपंच चव्हाण, सदस्य नरेंद्र कोळी, स्वप्नील काळोखे, सचिन साळुंखे, दिपाली जंबूकर, सुनिता टिळेकर, संतोष हागवणे, अभिजीत काळोखे, पूनम काळोखे यांनी मान्यता दिली आहे. जगद्‌गुरू सप्लायर, कृष्णप्रिया ट्रान्सपोर्ट, सारंगी सप्लायर, रामकृष्ण हरी एंटरप्राइजेस अशा विविध मुरूम सप्लायरमार्फत हा मुरूम मागविण्यात आला आहे. एकाच वेळी हा मुरूम न पडता टप्प्याटप्प्याने पडल्याने, तातडीच्या गरजेनुसार मागविण्यात आले होते. त्यामुळे निविदाचा प्रश्‍न उपस्थित होत नसल्याची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)