देहुगावाला समस्यांचे ग्रहण

  • राजकीय लाथाळ्यांचा प्रश्‍नही जटील

देहुरोड – तीर्थक्षेत्र देहुगाव परिसरात वीज, पाणी, रस्ता या मुलभूत समस्यांना देहुकरांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठा, मानसन्मान, पदासाठी, दारांवरील पाट्यांसाठी सदस्य असल्यांचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

तीर्थक्षेत्र देहु ही जगद्‌गुरू तुकाराम महाराजांची जन्म, कर्म, ज्ञान-योग भूमी आहे. वर्षांतून तीन वेळा लाखो भाविकांच्या आगमानाने मोठी यात्रा भरते. प्रतिदिन हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायतीत सतरा सदस्य आहे. या परिसरात सहा वार्ड आहेत. तळेगाव, चाकण, तळवडे परिसरात औद्योगीकरण (एमआयडीसी) तसेच कॅंटोन्मेंट आणि उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड महापालिका देहू लगतच असल्याने चाकरमानींची संख्या वाढतच आहे. त्यामुळे परिसरातील शेती संपून मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून सिमेंटची जंगले वाढत आहेत. परिसरात गुंठेवारी, प्लॉटींग, जमिनी विक्री होवून बांधकामे होत आहेत. मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभारले जात आहेत. देहूच्या उत्तरेला म्हणजेच नव्याने तयार होत असलेल्या शिवनगरी, शिवतेज नगरी, गंर्धवनगरी तसेच अभंग नगरीमध्ये याचे सर्वाधिक प्रणाम दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाच्या नियमांची पायमल्ली करून ठिकठिकाणी गृह प्रकल्पांची मोठ-मोठी बांधकामांमुळे विविध समस्याही उभ्या आहेत. त्याकडे महसूल विभाग व प्रशासनाने दुर्लक्षच आहे. बांधकाम परिसरात साचलेल्या पाण्याने डेंगूच्या डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. गावात कचऱ्यांचे ढीग वाढत आहे. गटारी, नाले तुंबल्याने दुर्गधी पसरत आहेत. वारंवार बदलणारे हवामानाने थंडी, ताप, उलटी, जुलाब, खोकला आजाराने रूग्णांची संख्या वाढत आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात बालकांच्या औषध व लसणीचा तुटवडा आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त लागणार का? तो ही प्रश्‍न अद्याप अनुत्तरीत आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा गटारे, नाल्यात राडारोडा टाकून अतिक्रमणे पुढे आली. दीड दोन मीटरच्या साईड पट्ट्यांवरील, पदपथासह रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाने, वाहतूक कोंडीने श्‍वास कायमच गोठला आहे. त्यामध्ये विविध व्यावसायिक, प्रापर्टी एजंट, बांधकाम व्यावसायिक, क्‍लासेस, शुभेच्छा, अभिनंदन, शोकाकुल, दु:खद निधनाच्या मोठमोठ्या फ्लेक्‍स, बॅनरने परिसर विद्रुप व अपघातांना आमंत्रण देत आहे. नाती-गोती, भावकी-गावकीमुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य याकडे डोळझाक करीत आहेत तर दिखाव्या पुरते कागदी घोडे नाचवत जबाबदारी झटकत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)