देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्यास शिक्षा

  • पंचवीस हजार रुपये आणि आठ फुटी दहा झाडे लावण्याचा दंड

लोणावळा – एक देशी पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवणाऱ्या एका हॉटेलच्या मालकाला वडगाव मावळ न्यायालयाने पंचवीस हजार रुपये दंड आणि आठ फुटी दहा झाडे लावण्याची अनोखी शिक्षा ठोठावली.

लोणावळा शहरातील जुना खंडाळा विभागातील एका रिसॉर्टमध्ये रिसॉर्ट मालक पी. टी. गिरिमोहन याने एक देशी पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवला असल्याची तक्रार वनखात्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार वनविभागाने हा रिसॉर्टवर छापा टाकून हा पोपट आणि पिंजरा ताब्यात घेतला.

वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट दाखल केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. मुळीक यांनी संबंधित रिसॉर्टच्या मालकाला पंचवीस हजार रुपये दंड आणि आठ फुटी दहा झाडे लावण्याची शिक्षा ठोठावली.

या गुन्ह्याचा तपास वनपाल एस. व्ही. सपकाळे यांनी केला, तर फिर्याद वनरक्षक गणेश झिरपे यांनी दिली होती. देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणे हा भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे उल्लंघन असून, अशा प्रकारचा गुन्हा कुठे घडत असल्यास त्याची माहिती वनखात्याकडे द्यावी, असे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.