देशाबाहेर पलायन करणे आर्थिक गुन्हेगारांना बनणार अवघड

संसदेची विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली – बड्या आर्थिक गुन्हेगारांना आता देशाबाहेर पलायन करणे अवघड बनणार आहे. संसदेने मंजूर केलेल्या महत्वपूर्ण विधेयकामुळे आर्थिक गुन्हेगारांच्या हालचालींवर निर्बंध येणार आहेत.

मद्यसम्राट विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी मोठे आर्थिक घोटाळे करून देशाबाहेर पलायन केले. त्यांच्याबाबतचा अनुभव ध्यानात घेऊन केंद्र सरकारने फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक आणले. त्या विधेयकाला लोकसभेने 19 जुलैला मान्यता दिली. त्यानंतर आज राज्यसभेतही ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आर्थिक गुन्हे करणारे कायदेशीर कारवाई टाळूून पलायन करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या घटना रोखण्याची गरज होती. आताचे कायदे या समस्येवर प्रभावी ठरत नव्हते. संबंधित विधेयकामुळे आर्थिक गुन्हेगारांचे देशाबाहेरील पलायन रोखणे शक्‍य होईल.

तसेच आधीच पलायन केलेले मालमत्ता जप्त होण्याच्या भीतीपोटी परततील, असे विधेयक सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले. या विधेयकातील तरतुदी 100 कोटी रूपयांपर्यंतच्या आर्थिक गुन्ह्यासाठी लागू होणार आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)