देशातील 30 पेक्षा अधिक विमानतळांवर अपुरी सुरक्षा व्यवस्था

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – देशातील 30 पेक्षा अधिक विमानतळांवर अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्याचे सीआयएसएफच्या (सेंट्रल इंडस्ट्रियल अँड सिक्‍युरिटी फोर्स) ऑडिट अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार देशातील 30 पेक्षा अधिक विमानतळांवर सीसीटीव्ही कॅमेरे, सामानासाठी एक्‍स रे मशीन्स, बॉंब डिटेक्‍टर आणि वॉकी-टॉकी आदींची कमतरता आहे.

देशातील सहा विमानतळांवर सुरक्षा नियमांनुसार 30 दिवसांचे डिजीटल सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तपास प्रक्रियेत अडचणी येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीआयएसएफने आपल्या ऑडिट अहवालात अत्यंत कमकुवत सुरक्षा व्यवस्था असलेल्या 34 विमानतळांचा उल्लेख केला आहे. या 34 विमानतळांवर मिळून 1832 सीसीटीव्ही कॅमेरे कमी असून त्याबाबत एएआयला (एयरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडिया) माहिती देण्यात आलेली आहे. काही विमानतळांवर डिजीटल व्हिडियो रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध नाही. अनेक विमानतळांवर पुरेसे पोलीस कर्मचारी नसल्याची माहितीही या अहवालात देण्यात आलेली आहे.

देशातील विमानतळ, बंदरे, पॉवर प्लांट आणि संवेदनशील सरकारी भवनांच्या सुरक्षिततेसाठी 1969 साली सीआयएसफची स्थापना करण्यात आली. देशातील 98 पैकी 60 विमानतळांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सीआयएसएफवर टाकण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)