नवी दिल्ली : देशातील कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेबद्दल देशातूनच नाही तर आता जगातून याचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. तसेच या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर दीर्घकाळ मौन पाळले असल्याचा आरोप करत जगभरातील ६००हून अधिक विचारवंत, अभ्यासकांनी शनिवारी संताप व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी मोदींना पत्र पाठवले असून, त्यावर न्यूयॉर्क, ब्राऊन, हार्वर्ड अॅण्ड कोलंबिया यांसारखी विद्यापीठे व ‘आयआयटीं’मधील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांच्या स्वाक्षरी आहेत.
‘कठुआ आणि उन्नावमधील घटनांवर आम्ही संताप व्यक्त करत आहोत. या घटनांनंतर त्या राज्यांतील प्रशासनाने हे राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने या घटनांवरून लक्ष वळवण्याचा, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. देशातील या भयानक स्थितीवर तुम्ही दीर्घकाळ मौन पाळून असल्याचे आणि या घटनांशी आपल्या पक्षाचे असलेले संबंध, जे नाकारता येणार नाहीत, आम्ही पाहात आहोत,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
वरील वृत्त वाचण्यात आले झालेल्या घटनेबाबत जसे दुःख व चीड येते त्याच प्रमाणे आपल्या देशातील ज्या विचारवंतांनी व अभ्यासकांनी ह्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यांची संख्या कळली असती तर ते सोडून १२५ कोटी पैकी मेलेल्या आईचे दूध प्यायलेले किती हे कळले असते