देशातील प्रमुख १५ विमानतळांची होणार विक्री; केंद्राच्या हालचाली

नवी दिल्ली : देशातील प्रमुख १५ विमानतळांची विक्री करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वीच देशातील ४ प्रमुख विमानतळांवर असलेले शासनाचे नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात आले आहे. यात दिल्ली, मुंबई, बंगळूरू आणि हैदराबाद विमानतळांचा समावेश आहे.

आता आणखी काही विमानतळांची विक्री केली जाणार आहे. असे झाले, तर भाजपप्रणित एनडीए सरकारचे हे एक मोठे पाऊल असेल. विशेष म्हणजे, ज्या विमानतळांचे यापूर्वी खासगीकरण झाले आहे, ती सर्व विमानतळ नफ्यात चालत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकार आहेत.

आता विक्री होणार असलेल्या विमानतळांमध्ये अहमदाबाद, चेन्नई, जयपूर, कोलकाता आणि लखनऊ विमानतळांचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील अहमदाबाद, जयपूर याविमानतळांच्या विक्रीची चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी सरकारला त्यात यश आले नव्हते. कारण, एकाही मोठ्या कंपनीने त्यात रस दाखवला नव्हता.

या विक्रीतून विमानतळांचा पायाभूत विकास होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी असलेली रिकामी जमीन उपयोगात आणली जाऊ शकते, असे सरकारचे नियोजन आहे. याबद्दल पीएमओने देखील नीति आयोगाला सूचना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)