श्री चिंतामणीला भरजरी पोशाख

थेऊर- चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्षारंभ होत असल्याने थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणीला भरजरी पोशाख घालून सजविण्यात आले होते. या सणाचे औचित्य साधून चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे श्री चिंतामणीला तीन शेर वजनाची साखरेची गाठी घालण्यात आली. नवीन वर्ष सुरू होत असल्याने व सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती. तसेच परिसरातील ग्रामस्थ नवीन वाहन खरेदी करून पूजेसाठी आणत असतात.

गावोगावी गुढ्या उभारून या सणाचे स्वागत केले जाते. तर काही ठिकाणी ऐतिहासिक गोष्टींची उदाहरणे देत घरावरती गुढ्या ऐवजी भगवी पताका उभारण्यात आली होती. त्यामुळे काही गावे भगवेमय झालेली दिसली. आज, पाडव्यामुळे जुन्या पद्धतीनुसार पावसाविषयी भाकीत सांगण्याची प्रथा आहे. ती देखील काही ठिकाणी पार पडली, बदलत्या आधुनिक जगात देखील या जुन्या प्रथा परंपरा खेडोपाडी जपताना ग्रामस्थ दिसत आहेत. गावाचे गावपण या संस्कृतीमुळे कुठेतरी टिकून आहे याचा भास यामुळे होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.