देशाची अधिकारशाहीकडे वाटचाल – पन्नालाल सुराणा

पिंपरी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला धोका निर्माण झाला आहे. एकाधिकारशाही आणि धर्मांधता यांच्यापासून देशाला वाचविण्यासाठी कष्टकरी जनतेची संघटीत होण्याची आवश्‍यकता आहे,. कष्टकरी जनताच देशाचा खरा आधार आहे. त्यासाठी देशातील 40 कोटी कष्टकरी जनतेने एकत्र व्हावे,असे मत नेते समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले. कष्टकरी कामगार पंचायत वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बांधकाम मजूर कष्टकरी मेळावा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.

बाबा कांबळे हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरीतील महात्मा फुले पुतळा उद्यानात झालेल्या या मेळाव्याला ऍड. संपतराव कांबळे, मेहबूब इनामदार, सलीम शेख, अरुण थोपटे, नवनाथ लोंढे, बी.आर. माडगूळकर आदी उपस्थित होते,
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, माता रमाई त्यागमूर्ती आहे त्यांच्याकडून त्यागाची प्रेरणा मिळते. गोरगरीब कष्टकरी जनतेच्या लढ्याची प्रेरणा मिळते त्याग, बलिदानशिवाय निश्‍चित यश प्राप्त होत नाहीत. बांधकाम मजुरांच्या प्रश्‍नांसाठी राज्यव्यापी लढा उभारला जाईल.

ऍड. संपतराव कांबळे यांनी जनचळवळीचे गाणे म्हणून भाषणास सुरुवात केली. मेहबूब इनामदार, बी.आर.माडगूळकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते बांधकाम मजूर महिलांना ओळखपत्र व मजुरांच्या मुलांना शिष्यवृत्ती फॉर्मचे वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम मजुरांच्या योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आणि धर्मराज जगताप,बळीराम काकडे प्रल्हाद कांबळे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here