देशांतर्गत हॅंडसेट उत्पादनात झाली मोठी वाढ: मेक इन इंडिया मोहिमेचे यश

परकीय चलनाची बचत

कोलकाता: देशांतर्गत मोबाइलचे हॅंडसेट तयार करणाऱ्या उद्योगांतून 3 लाख कोटी रुपयाची बचत करण्यात आली असून यातून विदेशात जाणारे चलन वाचवण्यात आले आहे. इंडिया सेल्युअर ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन (आयसीए)च्या अहवालानुसार मागील चार वर्षांत मोबाइल हॅंडसेट तयार करणाऱ्या उद्योग क्षेत्रात बाहेरून मागणी करण्याऐवजी ते देशांतर्गत उत्पादन करण्यात सुरुवात झाली आहे. यामुळेच ही बचत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2017-18 मध्ये 22.5 कोटी मोबाइल हॅंडसेट देशात निर्माण करण्यात आले. बाजारपेठेचे संशोधन केल्यानंतर एकूण 80 टक्‍के उत्पादन देशात करण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. तर 2018-19 मध्ये 29 कोटी हॅंडसेटचे उत्पादन करण्यात येणार असल्याचे ध्येय ठेवण्यात आले असून त्यांची बाजारातील किंमत एकूण 1 लाख 65 हजार कोटी असणार आहे. पहिल्या दोन तिमाहीत 13 कोटी हॅंडसेट निर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे यावेळी म्हटले आहे. याकरिता 75 हजार कोटींहून अधिक रुपये लागणार असल्याचेही सांगण्यात आले.

यात सर्वात जादा वेगाने स्मार्टफोन मार्केट वाढणार असून यात भारत आघाडी घेत असून जगतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे मार्केट बनले आहे. या स्पर्धेत चीन पुढे आहे. आर्थिक वर्ष 2018 शेवटीपर्यंत मोबाइल फोन आयात करण्यात घट होणार असून 1 हजार कोटी रुपये प्रत्येक महिन्याला कमी होणार आहे. तर जगतिक ब्रॅण्ड आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे भारतावर नजर राहणार असल्याचे आयसीए चेअरमन आणि राष्ट्रीय अध्यक्ष पंकज मोहिंदू यांनी म्हटले आहे.
मोबाइल फोन तयार करण्यात भारत वेगाने प्रगती करत असून तो इतर देशांप्रमाणेच आयात करणाऱ्या देशाच्या यादीत नोंद होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)