देशभरात शिक्षकांची तब्बल 10 लाख पदे रिक्त

नवी दिल्ली – देशभरात शिक्षकांची प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवरील तब्बल 10 लाख पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या यादीत उत्तरप्रदेश आणि जम्मू-काश्‍मीर ही राज्ये अग्रस्थानी आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. देशभरात प्राथमिक शिक्षण स्तरावर शिक्षकांची 51 लाखहून अधिक पदे मंजूूर आहेत. त्यातील 9 लाख 316 पदे रिक्त आहेत. त्यात उत्तरप्रदेशातील रिक्त जागांचा वाटा 2 लाख 24 हजार 327 इतका आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याखालोखाल बिहारमधील 2 लाख 3 हजार 934 पदे रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षण स्तरावर 1 लाखहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जम्मू-काश्‍मीरचा वाटा 21 हजार 221 इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)