देशभक्‍तीचे संस्कार विद्यार्थी दशेतच रुजावेत!

नायक दिगेन्द्र कुमार: “कारगील युद्ध’ आठवणींना उजाळा

पिंपरी – विद्यार्थी दशेत असतानाच मुला-मुलींमध्ये देशभक्तीचा संस्कार रुजविण्यासाठी पालक आणि शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत कारगील युद्धातील महावीर चक्र विजेते नायक दिगेन्द्रकुमार यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कारगील विजय दिवस व गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात नायक दिगेन्द्रकुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कारगील युद्धातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच श्रीलंकामध्ये एल. टी. टी. संघटनेच्या दहशतवाद्यांशी झालेल्या लढ्यातील प्रसंगांचीही त्यांनी आठवण सांगितली. कारगील युद्धातील प्रसंगांचे वर्णन करताना यावेळी भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेले शौर्य हे नक्कीच वाखाणण्याजोगे होते, असे त्यांनी सांगितले. भारतीय लष्करी जवानांच्या शौर्यकथा विद्यार्थींदशेतच युवकांना माहीत झाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्कीच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वक्ते डॉ. शरद जोशी यांनी सांगितले की, आयुष्यात प्रत्येकाने आपले आई, वडील आणि शिक्षक हेच खरे गुरु असतात हे विसरता कामा नये.

संस्थेच्या प्रा. सुनिता पाटील यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, निवृत्त लष्करी अधिकारी प्रतापराव भोसले, यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे यांच्यासह संस्थेचे अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)