देशभक्तीची सोयीस्कर व्याख्या तयार करण्याच्या ‘त्यांचा’ डाव : सोनिया गांधी

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशभरात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांद्वारे एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी राजकीय नेत्यांकडून दवडली जात नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून अशातच आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर नाव न घेता टीका केली आहे.

सोनिया गांधी यांनी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष एक विशिष्ट संस्कृती देशावर लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “देशामध्ये सध्या काही लोक आपल्याला देशभक्तीची नवीन व्याख्या शिकविण्याच्या प्रयत्नात आहेत, ज्यांना विविधतेमध्ये विश्वास नाही अशा लोकांना देशभक्त मानले जात आहे. काही लोकांना आमच्या राहणीमान, खानपान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचा असून आम्ही त्यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच वागावे अशी त्यांची इच्छा आहे.”

दरम्यान, संविधान सुरक्षित राखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष अबाधित ठेवण्यासाठी मदत करा. तसेच कट्टरता, व्देष आणि उदासीनतेला सत्तेपासून दूर ठेवा असं आवाहन सहाशेहून अधिक कलाकारांनी काल काढण्यात आलेल्या एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या पत्रकाखाली नसीरुद्दीन शाह, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, डॉली ठाकोर, अभिषेक मजूमदार, अनामिका हक्सर, नवेज जौहर, एम के रैना, महेश दत्तानी, कोंकोना सेन शर्मा, रत्न पाठक शाह आणि संजना कपूर यांच्यासारख्या संपूर्ण भारतभरातील विविध कलाक्षेत्रातील 685 कलाकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रकाद्वारे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करू नका असे आवाहन देखील करण्यात आलं होत.

अशातच आज काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी देखील असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.