देवीच्या मूर्ती बनवण्यात कलाकार मग्न

बेल्हे- गणेशोत्सव संपल्यावर पंधरा दिवसांतच नवरात्रौत्सवाची लगबग सुरू होत असते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही या उत्सवाची तयारी सुरू झाली असून, मूर्तिकार देवीच्या मूर्ती बनवण्यात मग्न झाले असून, त्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
भाद्रपद चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विर्सजन झाले की पुढील पंधरा दिवसांतच नवरात्र उत्सव सुरू होत असतो. आता केवळ दहा-बारा दिवसांवर हा उत्सव आला आहे. नवरात्र 10 ऑक्‍टोबरला सुरू होत आहे. त्यामुळे देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून, मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर आता शेवटचा हात फिरवत आहे.
राजुरी (ता.जुन्नर) येथे, देवींच्या मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या गावातील अनिल भिकाजी विश्वासराव हे गेल्या पंचवीस वर्षांपासून देवींच्या मूर्ती बनवत असून, याही वर्षी त्यांनी शंभराहून अधिक मूर्ती बनवल्या आहेत.
या मूर्ती साधारण एक फुटापासुन सात फुटांपर्यंतच्या असून त्याची किंमत साधारण दोन हजारांपासून दहा हजारांपर्यंत आहे. त्यांनी बनवलेल्या मूर्तींना जुन्नर, आंबेगाव, मंचर, अहमदनगर, संगमनेर, पारनेर तालुक्‍यातून चांगली मागणी आहे.
मूर्तीला लागणारे कलर, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि इतर साहित्य यांचे भाव वाढलेले असल्याने मूर्तीच्या किमतींमध्ये साधारण दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. किमतींमध्ये वाढ झालेली असली तरी या वर्षी पाऊस चांगला झालेला असल्याने मागणी चांगल्या प्रमाणात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)