देवीच्या मुर्ती बनविण्याची 60 वर्षाची परंपरा

गुरुनाथ जाधव
सातारा-  महिषासुर मर्दिनी देवीच्या मुर्ती बनविण्याची 60 वर्षाची परंपरा सातारा गडकर आळी येथील कुंभारवाड्यामध्ये पोपट कुंभार यांनी आजही जपली आहे. पोपट कुंभार यांचे आजोबा संतराम कुंभार यांनी गाळाच्या मातीपासून तसेच कौले भाजून साचे तयार करून मुर्ती घडवल्या होत्या. त्यानंतर वडील लक्ष्मण कुंभार यांनी त्याचा वसा घेऊन शाडू मातीच्या साहाय्याने कापूस, गवत, कळक, बांबू च्या पद्धतीचा अवलंब करत मुर्त्या बनविल्या. वेळे नुसार बदलत्या परिस्थितीत नव्या तंत्रज्ञाचा अवलंब आपल्या वडिलांच्या आजोबाच्या मार्गदर्शनाने स्वीकारला असल्याची माहिती पोपट कुंभार यांनी दिली.

सातारा शहरातील विविध मंडळामध्ये महिषासुर मर्दिनी रूपातील मुर्तीची मागणी प्राधान्याने असल्याचे त्यानी सांगितले. दुर्गा देवी उत्सवाला आता काहीच दिवस उरले असल्याने देवीच्या मुर्ती बनविण्याची लगभग सुरु असल्याचे दिसत आहे.
गाळाच्या मातीपासून ते आता शाडू, फायबर तसेच पीओपी च्या मुर्ती देखील याठिकाणी घडविल्या जातात. स्टील, पाईप, गंज, नारळाची केसर, काथ्या लोखंडी अँगलचा वापर करुन मुर्ती बनविल्या जात आहेत. मागील वर्षीच्या प्रमाणात या वर्षी किमतीमध्ये 15 टक्के वाढ करण्यात आली असल्याचेही त्यानी सांगितले. या वर्षी किमान लहान मोठ्या आकारातील एकूण 60 मुर्ती बनविण्याचे काम सुरु आहे. सातारा शहरातील कृत्रिम तळ्याची निर्मिती जिल्हा प्रशासनाने केली असल्याने. दुर्गा देवी विसर्जनाचा प्रश्न उद्‌भवणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)