देवगावच्या सरपंचपदी योगिनी खांडगे

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील देवगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वमान्य ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार योगिनी दिलीप खांडगे या 72 मतांनी विजयी झाल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. सर्वमान्य ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह उर्वरित चार जागा जिंकल्या आहेत. सरपंच पदाच्या उमेदवार योगिता खांडगे (386) यांनी उज्वला बाबाजी गावडे (314) यांचा 72 मतांनी पराभव केला. निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे – दिपाली उल्हास खांडगे, दिलीप शिवराम दाभाडे, इंदुबाई विठोबा खांडगे, दत्तात्रय महादू खांडगे. यापूर्वी द्वारका मच्छिंद्र कोकणे, ज्ञानेश्वर बापू दाभाडे, सुंदर शिवाजी खांडगे बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसामान्य देवगाव ग्रामविकास पनेलचे नेतृत्व बाळासाहेब खांडगे, पोपट पोखरकर, गोविंद खांडगे, निलेश खांडगे यांनी केले. नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयेश पोखरकर, रामचंद्र खांडगे, निवृत्ती दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, शहाजी वाळुंज, बाळासाहेब खळे, राजाराम दाभाडे, विशाल खांडगे, दीपक ढोबळे, बबन दंडवते, बाबाजी दाभाडे, संदीप भोसले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.