देणगीदात्यांचा तपशील सादर करा – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक आयोगाची सर्व राजकीय पक्षांना सुचना

नवी दिल्ली – राजकीय पक्षांना इलेक्‍ट्रोल बॉंडच्या माध्यमांतून ज्या देणग्या मिळाल्या आहेत त्या देणग्यांचा तपशील आणि देणगीदात्यांची नावे अशी सारी माहिती सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालाने दिला आहे. संबंधीत राजकीय पक्षांनी बंद पाकिटांमध्ये ही माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

इलेक्‍ट्रोल बॉंडच्या संबंधातील एका याचिकेवर दिलेल्या अंतरीम आदेशात न्यायालयाने हा आदेश दिला आहे. येत्या 30 मे पर्यंत राजकीय पक्षांनी ही माहिती सादर करायची आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी इलेक्‍शन बॉंड्‌सची योजना जाहीर केली आहे. या योजनेला एका स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला आहे.

या पद्धतीला स्थगिती द्या किंवा कोणत्या देणगीदात्याने कोणत्या पक्षाला किती पैसे दिली ही माहिती सार्वजनिक करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. इलेक्‍ट्रोल बॉंडची ही योजना 2 जानेवारी 2018 पर्यंत अस्तित्वात आली आहे. यात देणगीदात्याचे नाव किंवा त्यांने दिलेली देणगी जाहीर न करण्याची मूभा राजकीय पक्षांना देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.