देगाव-निगडी रस्त्यावर युवकाचा निर्घृण खून

सातारा  -देगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत देगाव ते निगडी रस्त्यावर एका युवकाचा डोक्‍यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मृतदेहाची ओळख पटलेली नाही. अधिक माहिती अशी, देगाव गावच्या हद्दीत निगडी रस्त्यावर एक मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

पोलीस पाटलांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी करून डोक्‍यात दगड घालून खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटली तरच पोलिसांना खूनाचे कारण व संशयितांचा शोध घेता येणार आहे. मृत व्यक्ती परप्रांतीय असल्याच्या संशयावरून पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या परप्रांतीयांकडे चौकशी केली. पण सोमवारी दिवसभरात मृतदेहाची ओळख पटली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.