देऊळगावराजे येथे 64 टक्के मतदान

देऊळगावराजे- देऊळगावराजे (ता. दौंड) येथे लोकसभेसाठी 64 टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदानासाठी लोकांचा उत्साह दिसत होता. मागील लोकसभेच्या तुलनेत देऊळगावराजे येथे मतदानाचा टक्का वाढला आहे. देऊळगाव येथे बूथ क्रमांक 134 ला मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत उभे असल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदारांना टोकन दिले आणि त्यानंतर साडेसहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. देऊळगावात एकूण 2868 मतदारांपैकी 1842 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.