देऊळगावराजेत अपंग निर्वाह भत्ता प्रमाणपत्राचे वाटप

देऊळगाव राजे- येथे जिल्हा परिषद पुणेच्या वतीने अपंगांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता प्रमाणपत्र (महिना 1 हजार रुपये पेन्शन योजना), तसेच रमाई घरकुल आणि अपंग घरकुल योजनेच्या लाभार्थींना आदेश वाटण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका उज्ज्वला शेळके, देऊळगावराजेच्या सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच चतुरा खेडकर, माजी सरपंच अमित गिरमकर आणि इतर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.