दूधधोरणाच्या निषेधार्थ शासनाची झोपमोड दूध वाटप आंदोलन

नगर – सरकारी दूधधोरणा विरोधात शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असता या आंदोलनात पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आदि स्वयंसेवी संघटना देखील उतरणार आहे. संघटनेच्या वतीने बुधवार दि.2 मे च्या रात्री जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटानादने शासनाची झोपमोड करीत, सरकारी अधिकार्यांना दूधाचे वाटप केले जाणार आहे. भेसळयुक्त दुधाने नागरिकांसह भावी पिढीचे आरोग्य धोक्‍यात टाकून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीस लावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची प्रतिमा दगडाला चिटकवून त्याला दुध व मलईचा अभिषेक घातला जाणार असल्याची माहिती ऍड.कारभारी गवळी यांनी दिली.
शेतकऱ्यांकडून संकलित केलेल्या एका टॅंकरच्या दुधावर प्रक्रिया करुन तीन टॅंकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जाते. याचा परिणाम दूध उत्पादक शेतकर्यांच्या दरावर झाला आहे. या दुधामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व भावी पिढीचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कृत्रिम दूध तयार करणार्या संघावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी व ग्राहकांची लूट चालू आहे. याला सरकारी धोरण जबाबदार असून, या खात्याचे मंत्री या विषयावर लक्ष द्यायला तयार नाहीत. एक प्रकारे दूध भेसळीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ऍड.गवळी यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)