दुहेरी फेम संकेत पाठक करतोय ‘दोस्तीगिरी’ सिनेमातून चित्रपटसृष्टीत डेब्यू

स्टार प्रवाहवर प्रसारित झालेल्या ड्रिंमींग ट्वेंटिफोर सेवन निर्मित दुहेरी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संकेत पाठक आता लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. संतोष वसंत पानकर निर्मित आणि विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमातून संकेत पाठक चित्रपटसृष्टीत आपला डेब्यू करत आहे.

संकेत ह्याविषयी सांगतो, “ड्रिंमींग ट्वेंटिफोर सेवनच्या दुहेरी मालिकेमूळे मला खूप प्रसिध्दी मिळाली. पण त्यासोबतच रूपेरी पडद्यार पदार्पण करण्याचंही स्वप्न होतं. ते दोस्तीगिरी सिनेमामुळे पूर्ण होणार आहे. मनोज वाडकर ह्यांची कथा, पटकथा आणि संवांद ह्या सिनेमात आहेत. आजपर्यंत माझा अभिनय मालिकांमधून प्रेक्षकांना दिसलाय. पण आता मी ह्यासिनेमात डान्सिंग आणि फाइटिंगही करताना तुम्ही पाहाल. दोस्तीगिरी सिनेमाची कथाच मला एवढी आवडली की मी सिनेमा करायचं लगेच ठरवलं. सिनेमात माझ्या जिवलग मित्रांच्या भूमिकेत अक्षय वाघमारे आणि विजय गिते तुम्हाला दिसतील.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स प्रस्तूत मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित दोस्तीगिरी चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)