दुसरी स्कॉर्पिअन पाणबुडी खंदेरी भारतीय नौदलाला सुपूर्त

नवी दिल्ली – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दुसरी स्कॉर्पिअन पाणबुडी “खंदेरी’ भारतीय नौदलाकडे सुपूर्त केली. पहिली पाणबुडी खंदेरी भारतीय नौदलात 6 डिसेंबर 1968 ला दाखल झाली होती. 20 वर्षांच्या सेवेनंतर 18 ऑक्‍टोबर 1989 ला तिला सेवेतून निरोप देण्यात आला होता.

स्कॉर्पिअन श्रेणीतली पाणबुडी बांधणे एमडीएलसाठी आव्हानात्मक होते. त्यावर मात करुन गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता खंदेरी बांधण्यात आली आहे. स्कॉर्पिअन श्रेणीतली तिसरी पाणबुडी “करंज’च्या सध्या सागरी चाचण्या सुरु आहेत.
उर्वरित दोन पाणबुड्या “वागीर’ आणि ‘वाग्शीर’ प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

स्कॉर्पिन वर्गातील पाणबुडी कोणत्याही आधुनिक पाणबुडीची विविध आक्रमक कार्ये करू शकते. त्यामध्ये जमिनीवर मारा करण्याबरोबरच पाणबुडीविरोधी सागरी युद्धाचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.