दुष्काळाशी आई-वडीलांचा लढा

युवा पिढीची मोबाईलवर “गेमशी’ लढाई

आकाश दडस
बिदाल, दि. 5 – माण तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेल्यांमुळे जनावरांच्या चारा-पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी आई-वडील संघर्ष करत आहेत. मात्र, विद्यार्थी, युवक, मोबाईलवर गेमवर खेळण्यात मग्न आहेत. युवकांनी मोबाईल गेम खेळण्यापेक्षा स्वतःच्या करिअरकडे लक्ष देण्याची गरज असून पालकांनीही भावी पिढीला वेळीच यापासून परावृत्त करण्याची गरज आहे.
अलिकडच्या काळात स्मार्ट फोनवरील इंटरनेटच्या माध्यमातून सारख्या नवनवीन गेम उपलब्ध होत असल्यामुळे लहान लहान मुलांपासून मोठे युवक देखील गेमकडे आकर्षित होत आहेत. दिवसेंदिवस गेम खेळण्यात युवक वर्ग तसेच लहान लहान मुले मग्न होत असल्यामुळे लहान मुले अभ्यासापासून तर युवक वर्ग त्यांच्या कामापासून अलिप्त राहू लागले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे नागरिकांना डोळ्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
सध्या सर्वत्र स्मार्ट फोन व इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र दहिवडी बसस्थानक, म्हसवड बसस्थानक, दहिवडी कॉलेज परिसरात, बसमध्ये प्रवासात, घरी या ठिकाणी बसलेल्या सर्व मुले दिवसभर मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेले दिसतात. मोबाईलमधील ऍपद्वारे अनेक गेम विनाशुल्क डाऊनलोड होतात. त्यामुळे अनेक युवक वेगवेगळ्या गेम डाऊऊनलोड करून वापरतात. मोबाईलमध्ये यापूर्वी कॅंडी क्रश, पोकेमॉन, क्वाईन मास्टर तर आता पबजी या गेमने मुलांना वेड लावले आहे. लहान मुले अभ्यास, मैदानी खेळ विसरून हा गेम खेळण्यात मग्न झालेले असतात. आहारी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेममुळे मोठी करमणूक होते
सध्या सर्वत्र मोबाईलमधील गेम खेळण्यात व्यस्त असलेल्या युवकांना गेमबाबत माहिती विचारली असता मोबाईलमधील गेममुळे करमणूक होत असून, ऑनलाईन गेम खेळण्यामुळे त्या गेममध्ये खेळणारे सर्वजण एकमेकांशी बोलून खेळतात.

सध्या वेगवेगळ्या गेमची मुलांना भुरळ पडत असून मुलांचे शाळेतील अभ्यासाकडे लक्ष नसते. मुलांची मानसिकता बदलली आहे. सध्याच्या शालेय मुलांना काही जुने खेळ हे माहित देखील नाहीत. मुले सध्या मोबाईलमध्ये गुरफटून जात आहेत. त्यामुळे शालेय मुलांना लवकरच डोळ्यांचा त्रास होत असून पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे.
-अशोक हांडे मानसशास्त्र “अभ्यासक”

सध्या मुलांना मोबाईलच्या तसेच टीव्हीच्या अति वापराने डोळ्यांना कोरडेपणा येत आहे. त्यामुळे मुलांची नजर कमी होत असून त्यांना थकवा जाणवतो. मुलांना तिरळेपणा देखील येऊ शकतो तसेच पुढील काळात मुलांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
-डॉ. प्रमोद गावडे म्हसवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)