दुष्काळग्रस्त 66 गावांना टॅंकरमुक्त झाल्याने गावकरी आनंदात

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) – दुष्काळग्रस्त माण तालुक्‍यातील 66 गावांसाठी हा पावसाळा म्हणजे उत्सव साजरा करण्याची वेळ आहे. ही गावे गेल्या सहा महिन्यांपासून टॅंकर मुक्त आहेत. हे सर्व शक्‍य झाले आहे डॉ. माधव पोळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक मंडळी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक यांच्या बारा वर्षे सुरु असलेल्या अथक प्रयत्नाने.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दहीवडी येथे श्रम संस्कार सोहळ्यात समाजातील प्रतिष्ठित नेतृत्व डॉ. माधव पोळ, सुरेखा माने आणि इतरांचा समाजाला संघटित करून दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील गावांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी केलेल्या मदती बद्दल सत्कार करण्यात आला.
विख्यात पाणी-तज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पाणी-व्यवस्थापनाच्या कामात सक्रीय सहभागाबद्दल ग्रामस्थांची प्रशंसा केली आणि अधिक झाडे लावण्याचे आवाहन केले होते.
या तालुक्‍यातील 20 टक्के गावे अद्याप टॅंकरमुक्त झालेले नाहीत आणि या कार्यक्रमाद्वार आम्ही अधिक समुदायांना एकत्र येण्याची आणि पाणी समस्या सोडविण्यासाठी काम करण्याची प्रेरणा देणार आहोत, असे कार्यक्रमाचे आयोजक अजित पवार म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सामाजिक बांधिलकी निर्माण कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनात बदल घडवून आणण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली आहेत. याच प्रयत्नांमुळे दहिवडीतील गावकऱ्यांनी 70 वर्षांत पहिल्यांदा एकत्र येऊन 25 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता असलेला सिमेंटचा बंधारा बांधला आहे.
गावांच्या परिवर्तनासाठी विविध सामाजिक घटकांना संघटित करत आहेत आणि परिवर्तन प्रतिनिधी म्हणून युवा नेतृत्व आर्ट ऑफ लिव्हींग तयार करत आहे. सामाजिक बांधिलकी निर्माण कार्यक्रमांमध्ये विविध विधायक कार्यक्रम पार पाडत आहे. ही संस्था भारतातील 40 नद्या आणि उपनद्यांतील पुनरुज्जीवन करण्याच्या दिशेने काम करीत आहे.
पूर्वी तालुक्‍याला पाणी पुरविण्यासाठी सरकार 10 कोटी रुपये खर्च करायचे. आज समुदायाच्या पाणवठा विकासाच्या (वॉटरशेडच्या) प्रयत्नांमुळे या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज एकही पैसा खर्च होत नाही,अशी माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमास दहिवडीतील 3000 हून अधिक स्थानिक ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)