दुलीप करंडक : फैझ फझल इंडिया ब्लू संघाचा कर्णधार 

दुलीप करंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर 
अभिनव मुकुंद, पार्थिव पटेलकडे अन्य संघांचे नेतृत्व 
नवी दिल्ली – पुढील महिन्यात पार पडणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तीनही संघांची घोषणा करण्यात आली असून इंडिया ब्लू संघाचे नेतृत्व विदर्भाचा रणजी करंडक विजेता कर्णधार फैझ फझलकडे सोपविण्यात आले आहे. दिवस-रात्र प्रकारची ही स्पर्धा येत्या 17 ऑगस्ट रोजी सुरू होत असून इंडिया रेड संघाचे नेतृत्व अभिनव मुकुंदकडे, तर इंडिया ग्रीन संघाच्या कर्णधारपदाची धुरा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलकडे सोपविण्यात आली आहे.
या तीनही संघांमध्ये युवा खेळाडूंचा, तसेच दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्याचप्रमाणे जयदेव उनाडकत व धवल कुलकर्णी या अनुभवी खेळाडूंचा इंडिया ब्लू संघात समावेश असून त्याचबरोबर कोना भारतसारख्या गुणवान यष्टीरक्षकालाही संधी देण्यात आली आहे. इंडिया रेड संघातही अभिमन्यू मिथुन, शाहबाझ नदीम व परवेझ रसूल अशा अनुभवी खेळाडूंसह मिहिर हिरवाणी व पृथ्वीराज यांसारख्या युवा गुणवान खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंडिया ग्रीन संघात अशोक दिंडा, अंकित राजपूत, सुदीप चटर्जी, जलज सक्‍सेना व कर्ण शर्मा या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अनुभवी खेळाडूंचा समावेश असून त्याबरोबरच के. विघ्नेश व विकास मिश्रा यांसारख्या नवोदितांनाही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. रणजी करंडक स्पर्धेतून भारताच्या कसोटी संघासाठी खेळाडू टिपण्यात येतात, तसेच दुलीप करंडक स्पर्धेतून मर्यादित षटकांच्या संघासाठी खेळाडू मिळत असतात. त्यामुळेच दुलीप करंडक स्पर्धेकडे जाणकारांचे आणि निवड समितीचेही लक्ष असते.

दुलीप करंडक स्पर्धेसाठी संघ- 
इंडिया ब्लू संघ– फैझ फझल (कर्णधार), अभिषेक रामन, अनमोलप्रीत सिंग, गणेश सतीश, एन. गंगता, ध्रुव शोरे, कोना भारत (यष्टीरक्षक), अक्षय वाखरे, सौरव कुमार, स्वप्निल सिंग, बेसिल थम्पी, बी. अय्यप्पा, जयदेव उनाडकत व धवल कुलकर्णी.
इंडिया रेड संघ– अभिनव मुकुंद (कर्णधार), आर. आर. संजय, आशुतोष सिंग, बाबा अपराजित, वृत्तिक चटर्जी, बी. संदीप, अभिषेक गुप्ता (यष्टीरक्षक), एस. नदीम, मिहिर हिरवाणी, परवेझ रसूल, आर. गुरबानी, अभिमन्यू मिथुन, ईशान पोरेल व वाय. पृथ्वीराज.
इंडिया ग्रीन संघ– पार्थिव पटेल (कर्णधार व यष्टीरक्षक), प्रशांत चोप्रा, प्रियांक पांचाल, सुदीप चटर्जी, गुरकीरत मान, बाबा इंद्रजित, व्ही. पी. सोळंकी, जलज सक्‍सेना, कर्ण शर्मा, विकास मिश्रा, के. विघ्नेश, अंकित राजपूत, अशोक दिंडा व अतिथ सेठ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)