दुर्लक्षित प्रायोगिक रंगभूला “टी फॉर थिएटर’ देणार उर्जा

नाटकवेड्या तरुणांकडून आगळी वेगळी संकल्पना : सोशल मिडीयाद्वारे होणार प्रचार

दि.31 – मनोरंजन क्षेत्रात नव-नव्या प्रयोगांमुळे आजची पिढी आधुनिक मनोरंजनाकडे वळालेली दिसून येते. बॉलीवूड, हॉलिवूड, टॉलीवूड यांसारख्या चित्रपटांना तरुणाईची पसंती आहे. मात्र यामध्ये पारंपरिक कला, नाटके याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मल्टीप्लेक्‍सच्या युगात प्रायोगिक रंगभुमी दुर्लक्षित राहाते की काय हा प्रश्‍न कलाप्रेमींना सतावत असताना काही नाटकवेड्या तरुणांनी यावर रामबान उपाय शोधून काढला आहे. चहा जसा काम करताना नवी उर्जा देतो, कामाची मरगळ झटकून नव्या जोमाने ते करण्याची उमेद देतो; त्याचप्रमाणे रंगभुमी थिएटर जीवंत ठेवण्यासाठी हाच धागा पकडून पुण्यातील काही तरुणांनी “टी फॉर थिएटर’ ही आगळीवेगळी संकल्पना सोशल मिडियावर साकारली आहे.
चहा आणि माणूस यांचे नाते अतूट असे आहे. चहा हा सृजनांची, नव्या संकल्पनांची निर्मिती करत असतो. निमित्त कुठलेही असले तरी पहिला चहा घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. चहाची हीच उर्जा घेऊन पुण्यातील नाटकवेड्या तरुणांनी “टी फॉर थिएटर’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. नाटकातील प्रेक्षकांचा ओढा कमी होत आहे.नाटकाला प्रेक्षक नाही ही बाब लक्षात घेत या तरुणांनी प्रायोगिक रंगभूमीवरील सादर होणारे विविध प्रयोग, कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून हा उपक्रम सुरू केला आहे. नवीन येणाऱ्या नाटकांची माहिती त्यातील कलाविष्कार रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या उपक्रमांतर्गत महिन्यातून साधारण दोन-तीन वेळा रंगकर्मींशी संवाद साधला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

22 जणांची “टी थिएटर’ टिम
या उपक्रमांतर्गत प्रायोगिक रंगभूमीवर होणारे विविध प्रयोग, कलाकृती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधून त्या प्रयोगातील वेगळेपण, बारकावे यांची चर्चा करून 10 ते 15 मिनिटांचे त्याचे व्हिडोओ केले जातात. हे व्हिडिओ फेसबूक, युट्यूब, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले जातात. तसेच प्रयोगाचे पोस्टर्स, माहितीची पोस्ट सोशल मिडियावर शेअर केल्या जातात. 22 जणांची असलेली ही “टी थिएटर’ टिम हे काम पाहाते. यामध्ये विक्रांत महल्लेसह रितेश परब, सुमंत ठाकरे, तृप्ती देवरे, सागर खांडे, केतकी अरबट, मृणाल टोपले, विशेष गांधी, आकाश सुहाने आदी तरुणांचा सहभाग आहे.

प्रायोगिक नाटकाकडे प्रेक्षकवर्ग कमी आहे. प्रायोगिक रंगभूमीवरही सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग होतात. मात्र प्रायोगिक नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. हीच वस्तूस्थिती लक्षात घेऊन “टी थिएटर’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विक्रांत महल्ले, टिम सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)