नाशिक : पाचव्या मजल्यावरुन मुलगी वडिलांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला.नाशकात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत लेकीचे प्राण मात्र बचावले आहेत. नाशिकमधील सामनगाव रोडवरील जयप्रकाश नगरमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली.
विजय गोधडे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव असून चौदा वर्षांची मुलगी सुनंदा गोधडे जखमी झाली आहे. विजय गोधडे यांच्या पुतणीच्या हळदीच्या कार्यक्रम होता, त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा