दुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न – पर्रीकर

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी – दुबईला अटक होऊन तेथील तुरुंगात पडलेल्या शिवोली येथील रायन डिसोझा या फुटबॉलपटूची सुटका व्हावी म्हणून आपण प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले. येत्या 6 किंवा 7 ऑगस्टला आपण दिल्लीत जाणार असून त्यावेळी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयापर्यंत आपण हा विषय पोहचवणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. अन्य कॉंग्रेस आमदारांनीही हळर्णकर यांना साथ दिली. बार्देश एफसी संघासाठी डिसोझा याची निवड झाली होती. तो चांगला फुटबॉलपटू आहे. त्याचा काही दोष नसताना दुबईतील एका घोटाळेबाज कंपनीचा कर्मचारी म्हणून त्यास विमानतळावर अटक झाली. तो फक्त तीन महिनेच तिथे काम करत होता. त्याचा घोटाळ्यात समावेश नाही अशी त्याच्या कुटूंबियांची व शिवोलीतील लोकांचीही भावना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने या विषयात गंभीरपणे लक्ष घालावे, केवळ एक ईमेल पाठवला म्हणून काम होणार नाही, असे हळर्णकर यांनी सांगितले. यापूर्वी खासदारांपर्यंत हा विषय नेण्यात आला होता, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)