दुध उत्पादकासाठी शासनाचे धोरण सकारात्मक नाही

अकलुज – कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना अनुदान द्यावे याकरीता राज्यातील सहकारी दूध संघाची अग्रही मागणी आहे; परंतु दूध उत्पादकासाठी शासनाचे धोरण हे सकारात्मक नसल्याने सहकारी दूध संघ अडचणीत सापडल्याचे वक्तव्य शिवामृत दूध संघाचे संचालक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित, विजयनगर, अकलूज या संस्थेच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली, याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी चेअरमन राजसिंह मोहिते-पाटील, विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन सावता ढोपे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. मोहिते पाटील पुढे म्हणाले की, सद्यःस्थितीत अत्यंत बिकट परिस्थितीत दूध व्यवसाय चालू आहे. दूध भुकटीचे दर कमी झालेले आहेत. परदेशातून भारतात दूध भुकटी येत आहे. दूध पावडर शासनाला मान्य आहे; परंतु दरामुळे व्यवसाय अडचणीत येत आहे. दूध व्यवसायिकांना सरकारचे सर्व समावेशक धोरण आसावे. दूध खरेदी करताना चढ्या दराने मात्र विकताना दो-तीन रुपये कमी दराने विकावे लागते, जेवढे पॅंकिंगला आवश्‍यक आहे तेवढेच दूध संकलित करण्याचे काम शिवामृत संघाचे चालू असून, कामगार कपात, वीज व अन्य खर्चात बचत करून बचतीच्या माध्यमातून नफा मिळवण्यासाठी संचालक मंडळ काम करत आहे, असे ते म्हणाले. प्रास्तविकात दत्तात्रय भिलारे यांनी संघाची सध्याची स्थिती सांगून पशू खाद्य दर्जेदार उत्पादन करून मार्केटमध्ये टिकून असल्याचे सांगितले, संघास 64 लाख 34 हजाराचा नफा अर्थिक वर्षात झाला असल्याचे सांगितले. सर्वसाधारण सभेचे विषय वाचन संघाचे मॅंनेजिंग डायरेक्‍टर रविराज इनामदार देशमुख यांनी केले. सर्व उपस्थित सभासदांनी सर्वानुमते ते मंजूर करून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेनंतर मान्यवराच्या हस्ते सातत्याने दूध घालणाऱ्या संस्था, जास्तीत जास्त दूध संकलित करणाऱ्या, जास्त पशू खाद्य खरेदी करणाऱ्या संस्था यांचे चेअरमन व सचिव यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार संचालक हरिभाऊ मगर यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)