दुध उत्पादकांना योग्य ते रिबेट देणार- आ. पिचड

अमृतसागर तालुका दुध संघाची सर्वसाधारण

अकोले –  काटकसरीच्या व नियोजनबद्ध कारभारामुळे अमृसागर तालुका दूध संघाच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली असल्याचे सांगत दिवाळीमध्ये दूध उत्पादकांना योग्य ते रिबेट जाहीर केले जाईल, अशी ग्वाही आमदार वैभवराव पिचड यांनी दिली. राष्ट्रीय विकास निधी नाकारला गेल्याने सरकारचा निषेध करून आ.पिचड यांनी “दूध दरवाढ उतार निधी’ करण्याच्या शासकीय धोरणाचा ठराव त्यांनी मांडला. त्याला यावेळेस मंजुरी दिली गेली.
अमृतसागर दूध संघाची वार्षिक सभा आ.पिचड यांच्या अध्यक्षतेखाली आज वाशेरे येथील दूध शाळा येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जे. डी. आंबरे, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, रावसाहेब वाकचौरे, रमेशराव देशमुख, रामहरी तिकांडे, अशोकराव देशमुख, राजेंद्र डावरे, शंभू नेहे, आशाताई पापळ, कुमुदिनी पोखरकर, नंदाताई धुमाळ, हेमलता चासकर, सिंधुताई उंबरे, सुधाकर देशमुख, माधवराव वैद्य, गणपत मोरे, मधुकर माने, संदीप शेटे, बाळासाहेब सावंत, भाऊसाहेब कासार, विजय लहामगे, राहुल देशमुख, सुनील वाळुंज, शांताराम धुमाळ, सुभाष घुले आदी उपस्थित होते.
आ.पिचड म्हणाले, दूध संघ आधुनिकरणासाठीचा प्रस्ताव शासनाने मागवले होते. त्यानुसार अमृसागरने प्रस्ताव दाखल केला.पण शासनाने जिल्ह्यात जास्त प्रस्ताव मंजूर केल्याचे कारण देत हा प्रस्ताव नामंजूर केला. याचा त्यांनी निषेध केला. दूध उत्पादकांना रिबेटचे जास्तीचे पैसे दिले म्हणून संघाचे संचालक मंडळ बरखास्त का करू नये? अशा कारणे दाखवा नोटीसा शासनाने अमृतसागरला पाठविल्याचेही आ.पिचड यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र कितीही नोटीसा आल्या तरी दूध उत्पादकबरोबर असल्याने आपण घाबरत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. आज बुधवारी महानंदाची बैठक आहे. त्यात रिबेट जाहीर होईल. त्याचा अंदाज घेवून दिवाळीला दूध उत्पादकांची मान खाली जाऊ देणार नाही, असा रिबेट दिला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
संघाने बर्फ कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. खासगी ठिकाणाहून बर्फ विकत घेतल्यामुळे खर्चात कपात झाल्याचे सांगत शासन धोरणानुसार दूध खरेदी दरात लिटर मागे 1 रुपया 64 पैसे वाढ करण्यात आली असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने विकास आराखडा नाकारला. त्याचा निषेध करताना शासन धोरणानुसार “दूध दर वाढ उतार निधी कपात ठराव यावेळी मंजूर केला.
अगस्ती कारखान्याचे संचालक महेशराव नवले व शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी अहवालावर प्रश्‍न उपस्थित करत दिवाळीला दोन रुपये रिबेट देण्याची मागणी केली. बल्क कुलर बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी सुचना संजय वाकचौरे यांनी केली. यावेळी सुरेश नवले, कैलास देशमुख, मारुती लांडे यांनीही काही सूचना केल्या. कार्यकारी संचालक डॉ. सुजीतकुमार खिलारी यांनी सर्व प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिली. जनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊपाटील नवले यांनी केले. प्रास्ताविक संचालक शरद चौधरी यांनी केले तर आभार संचालक प्रवीण धुमाळ यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)