दुधाऱ्या डोंगराला लागलेल्या आगीत वनसंपदेचे नुकसान

तीन हेक्‍टर क्षेत्रावरील वनसंपत्ती भस्मसात

ओझर- शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) वन हद्दीतील दुधाऱ्या डोंगरला गुरुवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता आग लागली. या आगीत सुमारे तीन हेक्‍टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. आठ तासानंतर आग आटोक्‍यात आली.
या डोंगरावरील दावल मालिकबाबा मंदिराकडे सकाळच्या वेळी काही अज्ञात तरुण गेले असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. डोंगराच्या वरील बाजूने आग लागल्याने या अज्ञात तरुणांकडून हे कृत्य झाले असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना डोंगराला आग लागल्याचे ग्रामस्थांकडून समजले तेव्हा त्यांनी घटनास्थळी जाऊन सहकारी आणि वनमजुरांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु ऊन्हाचा कडाका व वाहणारे वारे यामुळे आग लवकर आटोक्‍यात आणण्यास त्यांना यश आले नाही.
आगीमुळे डोंगरावरील गवत जाळून खाक झाले असून, तसेच नैसर्गिकरीत्या वाढलेल्या झाडांचे आणि नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीत अनेक पक्ष्यांची गवतातील घरटी जळून गेली आहेत. मानवाच्या अशा निष्काळजीपणामुळे जंगल संपत्तीचे मोठे नुकसान होत असून, वनसंपत्ती ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि तिचे जतन, रक्षण करणे आपले कर्तव्य आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे आहवान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)