दीपा चंदे यांची निवड दीनदयाळ परिवाराला अभिमानास्पद -वसंत लोढा 

नगर — नगर शहराचे नाव मध्यंतरी घडलेल्या विविध घटनांमुळे मोठ्या प्रमाणात बदनाम झाले आहे. नगरची झालेली ही बदनामी पुसून काढण्याकरीता सर्वांनी चांगले काम करणे आवश्‍यक आहे. पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या संचालिका दीपा चंदे यांची राज्य सरकारने दक्षता समितीवर केलेली निवड ही दीनदयाळ पतसंस्था परिवाराला अभिमानास्पद बाब आहे.
दक्षता समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करुन दीपा चंदे नगरचा नावलौकिक वाढवितील. गेल्या 20 वर्षांपासून संचालक पदाच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर नगरच्या खाद्य संस्कृतीतही त्यांनी मोलाची भर घातली आहे. या कामाची दखल राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरिष बापट व राज्य सरकारने घेतली आहे, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या संचालिका व नगरमधील सामाजिक कार्यकर्त्या दीपा चंदे यांची राज्य सरकारने नुकतीच दक्षता समितीवर निवड केली आहे. याबद्दल पंडित दीनदयाळ पतसंस्था परिवाराच्यावतीने अध्यक्ष वसंत लोढा यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, एल.जी.गायकवाड, आर.डी.मंत्री, जागरुक नागरिक मंचचे सुहास मुळे, अनिल मोहिते, मुकुल गंधे, नरेंद्र श्रोत्री, किरण ढापसे आदिंसह पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे, सुखदेव दरेकर आदि उपस्थित होते.
यावेळी सत्कारास उत्तर देतांना दीपा चंदे म्हणाल्या, नगर शहरासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात हॉटेल व खाद्य व्यवसाय वाढत आहेत. या सर्व हॉटेलमधून नागरिकांचा उच्च दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावेत, यासाठी आग्रही भुमिका घेणार असून, सर्व हॉटेल हायजीन व्हावेत, यासाठीही प्रयत्न करणार आहेत. पंडित दीनदयाळ पतसंस्थेने केलेला सत्कार प्रोत्साहन देणारा आहे.
यावेळी जागरुक नागरिक मंचचे सुहास मुळे यांनी नगरमध्ये काम करण्याकरीता दीपा चंदे यांच्या बरोबरीने काम करुन जागरुक नागरिक मंच सर्वोतोपरि सहकार्य करेल, असे आश्‍वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल मोहिते यांनी केले. निलेश लाटे यांनी आभार मानले. यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या सानिका कुकडे, अश्‍विनी चोपादंडी, मानसी कुलकर्णी, जया कोतवाल, उमेश मेरगु, महेश कटके, गणेश जंगम, सागर बडे, विजय मुत्याल, निखिल गायकवाड आदि कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)