दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आज विंदांची त्रिपदी हा कार्यक्रम

सातारा – दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे “विंदांची त्रिपदी’ हा कार्यक्रम शनिवार, दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विंदांनी स्वतः वाचलेल्या कविता बघायला ऐकायला मिळणार आहेत.

हा कार्यक्रम आनंद करंदीकर व सरिता आवाड हे सादर करणार आहेत. या कार्यक्रमास म. रा. वि. वि. कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील माने, महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, नगरवाचनालयाचे कार्यवाह व आनंदाश्रमचे अध्यक्ष डॉ. शाम बडवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विचार वेधतर्फे विनय पंडित व प्रा. डॉ. ओमप्रकाश कलमे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)