दीपक निकाळजेला हायकोर्टाचा दिलासा

अटकेची कारवाई 11 जूनपर्यंत टळली
मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अंडरवर्ल्ड गॅंगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी 11 जूनपर्यंत अटक करू नका, असा अंतरिम आदेश पोलिसांना देताना निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या 22 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून निकाळजेने चार वर्षे बलात्कार केल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन नवी मुंबई पोलिसांनी दिपक निकाळजे विरोधात बलात्कार, लैंगिक छळवणूक, फसवूणक आदी आरोपांखाली पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने अटकेची शक्‍यता निर्माण झाल्याने निकाळजेने सुरूवातीला कनिष्ट न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कोणताही दिलासा न दिल्याने त्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्यासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी निकाळजेच्या वतीने युक्तीवाद करताना निकाळजे व पीडित मुलगी या दोघांमध्ये मागील चार वर्षे परस्पर संमतीने शारिरीक संबंध ठेवले गेले. 2014 ते 2018 या काळात पिडीत मुलगी “लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होती. ती निकाळजेबरोबर काश्‍मिर व इतर ठिकाणी फिरायलाही गेली होती, असा दावा केला. उभय पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाळजेला 11 जूनपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना देताना निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश करण्यास मात्र मनाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)