दिशा वाकानीचे लवकरच पुनरागमन

टीव्हीवरील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या “तारक मेहता का उल्टा चश्‍मा’ या मालिकेतील दयाबेन अनेक महिन्यापासून गायब आहे. पण दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी लवकरच या मालिकेत पुनरागमन करणार आहे. याबाबत मालिकेचे लेखक शैलेश लोढा यांनी माहिती दिली आहे.

ते एका कार्यक्रमात म्हणाले, मालिकेत दिशा नक्की परतणार आहे. त्याचबरोबर शैलेश यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही दिशा वाकानी परत येणार असल्याचे सांगितले होते.

दिशा वाकानीला मालिकेत परत येण्यासाठी 30 दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त आहे. दिशाने 30 दिवसांत चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार आहे.

दरम्यान, जानेवारीत “तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले की, अद्याप दिशाचा करार रद्द करण्यात आलेला नाही. तसेच दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला दिशाच्या ऐवजी घेण्याचा अद्याप तरी आमचा काहीही विचार नाही. कार्यक्रमात परतणे हे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तिला परत यायचे असल्यास तिचे स्वागतच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.