#दिशादर्शक: सुप्रभात… 

 विजेन्द्र 
प्रसन्न वाटते ना? कोण कोणाला म्हणाले हे महत्त्वाचे नाही. का म्हणाले यालाही काही अर्थ देता येणार नाही. हे शब्द असे आहेत जे रामप्रहरी एकमेकांबद्दल आनंद देतात. या ठिकाणी ना कोणता धंदा असतो, ना व्यवहार. या शब्दांमध्ये फक्‍त एक आपलेपणा असतो. रोजच्या व्यवहारात अनेकजण भेटत असतात. हाय-हॅलो होत असते. पण ती एक फॉर्मेलिटीही असू शकते. मात्र, पहाटे उठून स्वच्छ हवेत फिरायला निघालेली व्यक्ती जेव्हा समोरचा जरी तो व्यवसायानुसार त्याचा प्रतिस्पर्धी असतो, त्याला कोणताही किंतू न ठेवता “सुप्रभात’ म्हणते तेव्हा त्यात एक आपलेपणा असतो.
तुम्ही बघा जर तुमचा कोणी दूर असलेला माणूस असो वा प्रतिस्पर्धी जर तुम्ही लवकर उठून फिरायला निघालात आणि नेमकी तीच व्यक्ती समोरून चालत चालत आली तर तुम्ही नुसते त्याच्या स्टाईलने हसून नाही तर बरोबर “सुप्रभात’ म्हणालात तर त्या व्यक्‍तीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसेल. याबाबत उदाहरण सांगायचे तर एका व्यक्तीचे देता येईल. तो पहाटे उठून मस्त स्वच्छ हवेत फिरायलाही जायचा.
मात्र, त्याचा कोणाशीही संवाद नव्हता. तरी एक व्यक्‍ती कायम तो समोर आला तर “सुप्रभात’ म्हणायचा. याच्या चेहऱ्यावरून सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया नसायची. मात्र, जसजसे दिवस जात गेले तसे ही व्यक्ती त्याच्याकडे बघून हसायला लागली. हळूहळू बोलूपण लागली. स्वतः थांबून बोलणे याबाबत त्याला आता काहीच वाटत नव्हते. पुढे त्यांच्यात या “सुप्रभात’ने मैत्रीही केली. काही शब्दांची जादू अशीच असते. फक्त ती ओळखायला हवी! तरच जीवनात एक मंगलमय पहाट उगवेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)