दिव्या मालपाणींनी दिलेल्या फिटनेस फंडा वर महिला खुश !

संगमनेर : फिटनेस एक्स्पर्ट दिव्या मालपाणी यांनी घेतलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महिलांना दिलेला फिटनेस फंडा शिबिरार्थी महिलांना मनापासून आवडला. संगमनेरमधील अनेक महिलांनी याचा लाभ घेतला. मालपाणी क्लबमध्ये फिटनेस एक्स्पर्ट दिव्या मालपाणी यांचे युवती व महिलांसाठी नुकतेच तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तंदुरुस्तीचे धडे गिरविण्यासाठी  संगमनेरमधील अनेक युवती आणि महिलांनी त्याचा लाभ घेतला. तंदुरुस्तीच्या सोबत प्रमाणबद्ध शरीरासाठी आयुष्यभर उपयुक्त ठरणार्‍या महत्वपूर्ण व शास्त्रशुध्द टिप्स या माध्यमातून महिलांना देण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्योजक गिरीश व सुनिता मालपाणी यांची कन्या असलेल्या दिव्या यांनी  स्ट्रेंग्थ ट्रेनिंग, बॉक्सिंग, कार्डीओ एक्सरसाईजेस, ऍब्ज यामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्याचा लाभ संगमनेर मधील युवती आणि महिलांना व्हावा या हेतूने सदर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये दिव्या यांनी प्रात्यक्षिके दाखविली तसेच प्रत्येक युवती आणि महिलेस व्यक्तिगत मार्गदर्शन केले. जिम मधील अत्याधुनिक साधनांचा वापर सुयोग्य पद्धतीने कसा करावा आणि शरीर हलके फुलके उत्साही कसे राखावे याबाबत महिलांनी विचारलेल्या अनेक शंकांना यावेळी दिव्या यांनी समर्पक उत्तरे दिली. स्थूलपणा ही अनेक युवती आणि महिलांना भेडसावणारी समस्या आहे. स्थूलतेमुळे एकूणच आरोग्य संकटात सापडण्याची शक्यता असते. स्थूलपणा अनेक व्याधींना निमंत्रण देत असल्याने त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)