दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी द्या!

राजपत्रित अधिकारी महासंघाची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मुंबई – राज्य सरकारी सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जानेवारी 2019 पासून थकित महागाई भत्त्यासह सातवा वेतन आयोग लागू करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने जानेवारी 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्याची मागणी केली आहे. ऑक्‍टोबरच्या पगारात ही थकबाकी मिळाल्यास अधिकारी-कर्मचारी वर्गाला दिवाळीमध्ये त्याचा उपयोग होईल, असे महासंघाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ सुरु करावी या महत्वाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी ऑगस्ट महिन्यात (7 ते 9 ऑगस्ट) तीन दिवसांच्या संपावर गेले होते. मंत्रालयातील कर्मचा-यांसह जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होऊन हा संप यशस्वी केला होता. या संपाच्या पार्श्वभूमिवर गेल्या महिन्यात 4 व 6 ऑगस्ट रोजी प्रशासन आणि अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्राप्रमाणे महागाई भत्तावाढ आणि थकबाकी विनाविलंब देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते, याकडे महासंघाने अर्थमंत्र्याचे लक्ष वेधले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारने केंद्राप्रमाणे महागाई भत्तावाढ देण्याचे धोरण ठेवलेले आहे. त्यानुसार गेल्यावर्षीची रक्कम मिळालेली आहे. परंतु, 2018 या वर्षांमधील महागाई भत्ता वाढ व थकबाकी अजूनही मिळालेली नाही. ही वाढ उशिरा दिल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढेल, तसेच थकबाकीची रक्कमही वाढेल, अशी भीती व्यक्त करतानाच नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण आहे.

त्यामुळे वर्ष 2018 मधील महागाई भत्ता वाढ व थकबाकीची रक्कम ऑक्‍टोबरच्या पगारातून द्यावी. त्यासंदर्भातील शासन आदेश तातडीने पारित करावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोषाध्यक्ष नितीन काळे व सरचिटणीस समीर भाटकर यांनी अर्थमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)