दिवाणी न्यायाधीश परीक्षेची उत्तरपत्रिका संकेतस्थळावर

पुणे, – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षेची “विहित कायदेविषयक ज्ञान’ या विषयाची प्रश्‍नपत्रिकेच्या चारही संचाची उत्तरपत्रिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा दि. 7 एप्रिल 2019 रोजी घेण्यात आली होती. या उत्तरतालिकेच्या प्रश्‍नोत्तरासंबंधी काही हरकती असतील, तर त्यांनी दि. 16 एपिलपर्यंत आयोगाच्या पत्त्यावर पाठवावेत. त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.