दिवशी घाटात दरडीमुळे प्रवास धोकादायक

धोकादायक वळणे देताहेत अपघाताला निमंत्रण : वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण

ढेबेवाडी, दि. 30 (वार्ताहर) -ढेबेवाडी-पाटण भागाला जोडणारा दिवशी घाट हा अत्यंत धोकादायक बनला असून दहा किलो मीटरच्या या घाट रस्त्यावरील धोकादायक वळणे, ढासळणार्‍या दरडी अपघाताला निमंत्रण देत आहेत. वारंवार दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे या घाटातील प्रवास धोकादायक बनला आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष घालून घाट रस्त्यावरील प्रवास सुकर करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
ढेबेवाडी भागासाठी पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांची दिवशी घाटातूनच सतत वर्दळ सुरु असते. या रस्त्याच्या कामासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार वर्षापूर्वी 7 कोटींचा निधी देऊनही या घाट रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झालेली आहे. या घाट रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल वेळोवेळी तक्रारी देऊनही बांधकाम विभागाने याकडे कानाडोळा केला आहे. सध्या पावसाचे दिवस असून या घाटात वारंवार दरडी कोसळत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. या घाटात संरक्षण कट्टे तुटलेले आहेत तर धोकादायक वळणे, ढासळणार्‍या दरडी व अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना घाटातील प्रवास करताना कसरतच करावी लागत आहे.
या घाटात एखादा मोठा अपघात झाल्या नंतरच झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल वाहन चालक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)