दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या अध्यक्षावर हल्ला

न्यूयॉर्क: दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजीत सिंग जीके यांच्यावर आज खलिस्तानवाद्यांकडून कॅलिफोर्नियामध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यआदरम्यान एकजण जखमी झाला. पुढील वर्षी होणाऱ्या गुरु नानक यांच्या 550 व्या जयंती निमित्ताने कॅलिफोर्नियातील शिख समुदायाबरोबरच्या चर्चेसाठी मनजीत सिंग तेथे गेले होते. कॅलिफोर्नियामधील युबा सिटीमधील गुरुद्वारामध्ये ते जाणार होते. त्यावेळी खलिस्तान समर्थक 30 ते 35 जणांनी मनजीत सिंग यांच्यावर हल्ला केला. त्यांनी मनजीत सिंग यांना ढकलून खाली पाडले आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. स्वतः मनजीत सिंग यांनी कॅलिफोर्नियातून फोनवरून ही माहिती दिली.

या मारहाणीदरम्यान मनजीत सिंग यांच्या एका सहकाऱ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खलिस्तानची मागणी ज्यांना करायची आहे, त्यांनी जरून तशी मागणी करावी. मात्र हिंसाचार हा त्याचे उत्तर नाही. खलिस्तानसाठीच्या या हिंसाचारामध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असेही मनजीत सिंग म्हणाले. मनजीत सिंग यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला होता. यापूर्वी न्यूयॉर्कमध्येही त्यांच्यावर असाच हल्ला झाला होता. मनजीत सिंग यांनीच हिंसा भडकावल्याचा आरोप “जस्टीस फॉर सिख’ संघटनेच्यावतीने केला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)