दिल्ली कॅपिटल्स समोर मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत

मुंबई – शिखर धवन, कॉलिन इन्ग्राम आणि ऋषभ पंत यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सलामीच्या सामन्यात २१३ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईच्या संघाने घेत, सुरुवातीलाच सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना झटपट बाद केले. त्यानंतर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचून दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा डाव सावरला. मात्र या दोन्ही फलंदाजांना आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. मधल्या फळीतील फलंदाज ऋषभ पंतने पुढे मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत केवळ १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी २१४ धावांची गरज आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी करत असून रोहित शर्मा (१४), डी कॉक (२७) आणि सूर्यकुमार यादव(२) हे फलंदाज बाद झाले आहेत. सध्या मुंबई संघाच्या ८ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात ६२ धावा झालेल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी मुंबईच्या संघाला ७२ बॉल मध्ये १५२ धावांची आवश्यकता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.